💐💐भटकंती मनसोक्त💐💐
कर्नाळा किल्ल्यावर पदभ्रमणाच्या निमित्ताने पाच सहा वेळा जायला मिळाले आहे . मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करताना या किल्ल्याच्या माथ्यावर असलेला उत्तुंग ‘ सुळका ‘ माझे लक्ष वेधून घ्यायचा . आपण एकदा तरी या सुळक्यावर चढाई करावी अशी इच्छा मनी यायची . साद गिर्यारोहण संस्थेने एकदा कर्नाळा आरोहण कार्यक्रम आखला तेव्हा इतरांसह मला कर्नाळा सुळक्यावर आरोहण करायला मिळाले . महाराष्ट्रातील इतर सुळक्यांएवढी ही चढाई कठीण नसली , तरी कातळकड्याच्या वाटेत मधाची मोठी पोळी आहेत . त्यामुळे खूप सावध राहून चढावे लागते . कर्नाळा किल्ला खास आठवणीत राहिलाय तो एका थरारक आठवणीमुळे . भटकंतीमध्ये अवचित समोर येणाऱ्या जीवघेण्या संकटाशी सामना करताना कशी कसरत करावी लागते , त्याचा चांगला धडा आम्हाला त्यावेळी मिळालाय …………….. 💐 कर्नाळा पदभ्रमणात अनुभवले...