Posts

Showing posts from February, 2022

💐💐चित्रपट गप्पा💐💐

Image
                  मुंबईतील चव्हाण सेंटरमध्ये २००९ साली अर्जेंटिनाचा फिल्म फेस्टिव्हल सुरू होता . तेथे ‘ जाएन्ट्स ऑफ वॅल्ड्स ’ हा चित्रपट पाहायला मिळाला . आपल्याला निसर्ग , प्राणी - पक्षी आणि निर्मळ पर्यावरण हवेय , की नुसते पैशाच्या मागे धावून आपण जगण्याचा सारा ताळमेळ बिघडवून टाकणार आहोत ? हा सवाल करीत प्रेक्षकाला विचार करायला लावणारी ही छोटीशी चित्रकथा आहे ……….. 💐 जाएन्ट्स ऑफ वॅल्ड्स (Giants of Valdes)- २००८ , दिग्दर्शक - अलेक्स टॉसन बर्गर , प्रमुख भूमिका - फेडरिको डेल्ला व मायग्वेल डेडोविच .                     या चित्रपटात दोन नायक आहेत . एक थॉमस व दुसरा ज्योस . थॉमसला वॅल्ड्स ( पेनिनसुला ) या पेंटोगोनियाच्या प्रांतातील एका समुद किनाऱ्यावर पाठविले जाते . एका हॉटेल कंपनीला या परिसरात छानसे हॉटेल उभारायचे आहे . थॉमस त्या कंपनीच...