Posts

Showing posts from January, 2022

💐💐थिएटरमध्ये💐💐

Image
          नाटक किंवा सिनेमा आपण थिएटरमध्येच पहावा , अशा मताचा मी आहे . कारण थिएटरमध्ये या कलाकृतीचे आकलन रसिक प्रेक्षकांना व्यवस्थितपणे होते . त्यात आनंद जास्त मिळतो . पण आज घरोघरी असणाऱ्या टिव्ही - मोबाईल , आणि इंटरनेट माध्यमांमुळे प्रेक्षकांना कधीही , कुठेही नाटक - सिनेमा पहायची मोठी सोय झालेली आहे . हे पाहणे सुलभ असले , तरी त्यात गंभीरता नसते . त्याचा आस्वाद एकाग्रतेने घेताही येत नाही .               अशाही स्थितीत , मी पूर्वी कधी घरच्या टीव्हीवर बघितलेले एक मराठी नाटक मला या क्षणी आठवत आहे . ते नाटक विशेष प्रसिद्द नव्हते . त्याचा गाभा , जो मला काहीसा उमगलाय , तो मी थोडक्यात इथे सांगत आहे ……………. 💐 चौकट 💐            नाटकाचं नाव आहे ‘ चौकट ’. त्याचे लेखक आहेत शफाअत खान . विजय कदम आणि स्वाती टिपणीस या गुणी कलावंतांनी त्यात काम केलेय . ...