💐💐आठवणीतील व्याख्याने💐💐

दादर येथील सुप्रसिद्ध समाजसेवी संस्था अमर हिंद मंडळ ही दरवर्षी वसंत व्याख्यानमाला आयोजित करते . विख्यात साहित्यिक , राजकारणी , वक्ते - प्रवक्ते , आणि कलाकर्मी या व्याख्यानमालेत आपापले विचार मांडतात . मला त्याठिकाणी बऱ्याच प्रसंगी जाण्याची संधी मिळाली . एका वर्षी , म्हणजे १९९८ साली त्या व्याख्यानमालेत न्यायमूर्ती पी . बी . सावंत यांनी ‘ लोकशाहीतील अंतर्विरोध ’ या विषयावर आपले विचार श्रोत्यांपुढे मांडले . त्यातले काही संदर्भ आज बदलले असले , तरी लोकशाही मानणाऱ्या जागरूक व्यक्तीला ते विचार योग्य वाटावेत असे आहेत . त्या व्याख्यानाचा ग...