💐💐वाचनछंद💐💐

मराठी साहित्य आणि नाट्यविश्वातील जाणते लेखक - नाटककार वसंत कानेटकर यांनी लिहिलेली बहुतेक नाटके मला पाहायला मिळाली . विशेषतः त्यांची ऐतेहासिक नाटके मी आवर्जून पाहिलीत . नाट्यगृहातील सारे प्रेक्षक इतिहासकालीन व्यक्तिमत्व पाहाताना , त्यांचे अभिनय व संवाद फेक अवलोकन करताना प्रभावित व्हायचे . रायगडाला जेव्हा जाग येते आणि इथे ओशाळला मृत्यू ही त्यांची नाटके खूप गाजली आहेत . इतिहासाचा अभ्यास करून जुने उपलब्ध दस्तऐवज पाहून , तपासून संबंधितांकडे खात्री करून आणि प्रसंगी त्या स्थळांपर्यंत जाऊन खातरजमा करणारे आणि त्यानंतर आपली नाट्यकृती निर्माण करणारे वसंत कानेटकर हे वास्तववादी नाटककार ह...