💐💐मन भावन गीत, गाणे आणि कविता💐💐

बाळ कोल्हटकर हे माझे आवडते नाटककार . त्यांचे प्रत्येक संगीतमय नाटक नऊ अक्षरांच्या नावाने प्रसिद्ध व्हायचे . त्याचे कोडे मला अद्याप उमजले नाही . मात्र या मनस्वी कलाकर्मीचे प्रत्येक नाटक संवेदनशील रसिक प्रेक्षकांना भावायचे व नाट्य प्रयोग हाऊसफुल्ल व्हायचे . लेखन , दिग्दर्शन आणि अभिनय अशा तीन्ही जबाबदाऱ्या पेलणाऱ्या बाळ कोल्हटकरांच्या प्रत्येक नाटकामध्ये भावनेने ओथंबलेले प्रदिर्घ संवाद असायचे , संस्कारशील कुटुंबे असायची . प्रसंगी डोळे भरून येणारे सीन्स असायचे . त्यांचे नाटक संपताना कोणता ना कोणता संस्कारी संदेश घेऊन प्रेक्षक बाहेर यायचे . कोल्हटकरांची दोन नाटके विशेष ...