💐💐लक्षवेधी💐💐

हिमालयात भटकंती करताना अंगावर साहस घेण्याची प्रबळ इच्छा मनात आली तर ? तर शुभ्रधवल हिमालयीन शिखरे आपल्या स्वागतास सदैव सज्ज असतात . त्यांच्या सानिध्यात आपली ऊर्जा अधिक वाढत राहाते . गिरी दुर्गात फिरणाऱ्या तरुण गिर्यारो हकांना प्रोत्साहित करून त्यांची साहसी वृत्ती वाढविणारे हरिष कपाडिया हे असेच एक साहसी व लक्षवेधी व्यक्तिमत्त्व आहे . त्यांनी हिमालयात नवनवीन ट्रेकिंग रुट्स शोधून काढले आहेत . सह्याद्री तसेच हिमालयातील दुर्गम भागात जाऊन , परिसराची वास्तव माहिती संकलित करून , त्यावर अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली आहेत . अप्रसिद्ध अशी हिमशिखरे पादाक्रांत करण्याच्या मोहिमा आखून त्या हरिषभाईंनी यशस्वी केल्या आहेत . याच...