Posts

Showing posts from March, 2021

💐💐भटकंती मनसोक्त💐💐

Image
             गिर्यारोहण करताना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील कठीण सुळके - कडे आणि प्रस्तर , भिंतींवर आरोहण करण्याची कधी संधी मिळाली तर , अनुभवी सिनिअर्स मंडळीनी केलेले नेतृत्व आपल्याला जवळून पहायला मिळते . त्यांनी दिलेले मोलाचे धडे   पुढील मोहिमांत उपयोगी ठरतात . आपली साहस वृत्ती वाढत असताना मनोबलही वाढत असते . या शिवाय , कठीण परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्याची कुवत निर्माण होते .                 मात्र प्रत्येक चढाईची   मोहिम आपली कसोटी घेत असते . मोहिमेत क्षणोक्षणी धोके समोर येत असतात . अशा स्थितीत कधी आपल्या किंवा सहकाऱ्याच्या हातून क्षुल्लक चुक घडली , तरी गंभीर अपघात घडतो अन सारेच संपते !                 कधी आरोहण करताना अथवा उतरताना आपली नजर सहज जरी खाली गेली , तरी डोके भिरभिल्यागत ...