Posts

Showing posts from February, 2021

💐💐सु-विचार💐💐

Image
                        “ जे कुणी खूप सहन केले , खूप सहन केले असे ओरडून सांगतात , ते खरे तर जगाकडून सहानुभूती मिळवत असतात . जो सहन करतो , तो कधी बोलत नाही “. – व . पु . काळे                                                                       ::::::::::::::::::::::::::::

💐💐ट्रेकर्स डायरी💐💐

Image
                  गोवा म्हटले की चटकन आपल्या नजरेसमोर येतो , तो विस्तीर्ण असा समुद्र आणि वळणदार असे बीचेस . नारळ - सुरुच्या सानिध्यात बीचवर मनसोक्त फिरकी - गिरकी घेणारे पर्यटकही नजरेसमोर तरळतात .                   माझ्या गोव्यातील पदभ्रमण सफरीमध्ये मात्र गोव्यातले घनघोर जंगलसुद्दा येते . ग्रामीण परिसरही येतो . दिल्लीच्या युथ हॉस्टेल्स असोसिएशनने आयोजित केलेल्या ‘ एन . टी . ई . पी .’(NATIONAL TREKKING EXPEDITION PROGRAMME) पदभ्रमण मोहिमेमध्ये मी एकदा सहभागी म्हणून होतो . तर एकदा ‘ कॅम्प लीडर ’ म्हणून सेवा करण्याची संधी मला मिळालीय .                   या गोवा पदभ्रमण मोहिमेला देशभरातील निसर्गप्रेमींचा भरघोस प्रतिसाद लाभतो . पणजीतील कंपाल स्टेडियम येथे मोहिमेचा आरंभ होत...