💐थिएटरमध्ये💐

💐 थिएटरमध्ये 💐 एका मराठी टीव्ही वाहिनीवर सध्या एक मालिका सुरू झाली आहे . ती अधून मधून पाहताना मला एका मराठी नाटकाची आठवण झाली . आम्ही ते १९९६ साली पाहिलंय . त्या नाटकाचे नाव होते - कुसुम मनोहर लेले . चतुर व लबाड विधुर तरुणाकडून फसवणूक झालेल्या एका तरुण महिलेची नंतर किती फरफट होते , हे दाखविणारे ते नाटक आज आठवले , तरी मनी अस्वस्थता येते . इतकी लबाड माणसे जगात असतात ? स्वार्थासाठी एवढी खालची पातळी ती गाठु शकतात ? हे सगळे भयंकर आहे . मला या गंभीर विषयावरील नाटकाचं कथानक तुम्हाला सांगायचंय , तुम्हीही अस्व...