💐मनातलं जनांत💐

💐 मनातलं जनांत 💐 आयुष्यात धडपडीला खूप महत्व आहे . ही धडपड आपल्याला नेहेमी प्रयत्नशील ठेवते आणि कधी पडल्यावर आपल्याला ती सावरते देखील ! आपण कधी सरळ , तर कधी वळणं वळणं घेत पुढे वाटचाल करीत राहातो . या वाटचालीत वाटेत आलेले प्रत्येक वळण सुंदर करणे आपल्याच हाती असते , याचे भान मला एका सुंदर शिबिराने दिले . त्यातून मला चांगली प्रेरणा मिळाली . एका स्वयंसेवी संस्थेने दोन दिवसांचे ‘ यु टर्न ’ शिबीर भरविले होते जुन्नर जवळील ओझरला . योगायोगाने मला त्या शिबिरात सहभाग घेता आला . तेथे मला मिळालेल्या चांगल्या अनुभूतींविषयी मी तुमच्याशी हितगुज करणार आहे ……….. 💐 आयुष्याचा यु टर्न -- ओझर शिबीर 💐 ‘ यु टर्न ’ शिबिराचे आयोजन के...