💐धार्मिक पण मार्मिक💐

💐 धार्मिक पण मार्मिक 💐 हिरवागार श्रावण मास आला आणि गेलाही . लॉकडाऊच्या या वातावरणात दहीकाला , राखी पौर्णिमा हे सण साजरे झाले . नंतर भाद्रपद सुरू झाला . गौरी गणपती सणाचा हा उत्साही माहोल असतो . पण महामारीच्या या संकटकाळात आपण सारे लॉकडाऊनच्या बंधनात अजूनही अडकलो आहोत . हा उत्सव भाविकांनी स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची खबरदारी घेऊनच साजरा करायचा आहे . सरकारी बंधनं पाळायची आहेत . लॉक डाऊन काही पूर्णपणे उठलेले नाही . मात्र या वातावरणामुळे सारे श्रद्धाळू अस्वस्थ आहेत . मी सुद्धा अस्वस्थ आहे . कधी संपणा...