💐आठवणीतील व्याख्याने💐

💐 आठवणीतील व्याख्याने 💐 स्वातंत्र्य पूर्व काळातील थोर नेते लोकमान्य टिळक यांच्याविषयी एक विशेष व्याख्यानमाला चिपळूण ( जिल्हा रत्नागिरी ) येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केली होती . त्यातले पहिलेच व्याख्यान प्रत्यक्ष ऐकण्याचा योग मला आला . लोकमान्य टिळकांनी आयुष्यात देशाच्यास्वातंत्र्य लढ्यात योगदान देताना वैयक्तिक आयुष्यात किती वेदना सहन केल्या . गाजावाजा न करता किती पुण्यकर्म केले , या विषयी टिळक कुटुंबाची पूर्वकहाणी व लोकमान्यांची स्वभाव वैशिष्ट्ये त्यांच्या गुणदोषांसह सांगणारी ही विशेष व्याख्यानमाला चिपळूणमधीलच एक अभ्यासू व लोकप्रिय प्राध्यापक धनंजय चितळे यांनी श्रोत्यांपुढे सादर केली . लोकमान्य टिळकांनी वर्गात , ’ मी शेंगा खाल्ल्या नाहीत , म्हणून मी काही शिक्षा भोगणार नाही ‘, अशा स्पष्ट शब्दात ...