💐धार्मिक पण मार्मिक💐

💐धार्मिक पण मार्मिक💐 लहान-थोर, गरीब-श्रीमंत, साक्षर-निरक्षर, देशी-परदेशी, अशा सर्वस्तरावरील श्रद्धावानांना ऊर्जा देणारा व त्यांचा उत्साह वाढविणारा श्रीगणेशोत्सव आज सर्वदूर गाव-शहर-देश-परदेशात साजरा होत आहे. जातीपातीच्या आणि धर्माच्या अभेध्य अशा भिंती ओलांडून अवघे विश्व व्यापणारा हा सण साजरा करताना या उत्सवात काय योग्य आणि काय अयोग्य, याचा भाविकांनी, तसेच आयोजक-संयोजकांनी गंभीरपणे विचार करावा, असे मनोमन मला वाटतेय. खास करून महाराष्ट्र राज्यातील मुंबापुरी मध्ये समाजमनांत घर करून बसलेला सार्वजनिक गणेशोत्सव आज कसा साजरा होतोय, पूर्वी कसा व्हायचा आणि उद्याच्या काळात कोणती परिस्थिती असेल याविषयी मला काही सांगायचंय, माझ्या नजरेतून…..… … 💐 मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव—काल आणि आज………. *काल… गिरणगाव-- माझे बालपण आणि शिक्षण मुंबईतील गिरणगावामध्ये झालेय. १९७० पासून १९९६ या काळातले सांगतो आहे. हा सगळा भाग कापड गिरण्यांचा( म्हणजे टेक्सटाईल मिलचा,) साहजिकच गिरणी कामगार, माथाडी...