💐मनातलं जनांत💐

💐मनातलं जनांत💐 फोन स्वतःकडे असणं ही आता प्रत्येकाची अत्यावश्यक बाब झालेली आहे. त्यातही हा फोन आपल्या हातात सतत असावयास हवा ! नाहीतर आपण मागासलेले--अडाणी ठरतो ! हा फोनज्वर आज पुऱ्या देशभर/भारतभर पसरलाय. दररोज प्रवास करताना-लोकल ट्रेन मध्ये, दूरवरच्या प्रवासात मेल/एक्सप्रेसमध्ये, रस्त्यात, ऑफिसमध्ये, रेल्वे प्लॅटफॉर्मवर, गाडी चालविताना, अगदी टॉयलेटमध्ये सुद्दा हातातला फोन बाजूस ठेवणे अवघड जाते या फोनबहाद्दरना ! मला याविषयीच अशा फोनबहाद्दरांशी थोडं बोलायचं आहे..... 💐हातात ' फोन ' स्मार्ट ' , पण बुद्दी आहे ' माठ ' !......... जवळपास ८० टक्क्यांहून अधिक मोबाईलफोन धारक अध्य यावत व महागडा फोन हाताळतात, पण त्या फोनचा ' स्मार्टनेस' काही आत्मसात करून घेत नाहीत. या फोनमध्ये ज्ञान देणाऱ्या व तुमच्या मेंदूला चालना देणाऱ्या एवढ्या गोष्टी उपलब्ध असतात की, आपण त्या बहुगुणी ...