💐मनभावन कविता💐
💐मनभावन कविता💐 नववर्षाचे स्वागत करताना समाजमनात एकरूपता यावी, व या एकरूपतेतून स्नेहभावाचे सुवर्णफुल उमलावे की जे कधीच कोमेजणार नाही. हाच आशय सांगणारी ही मनभावन कविता........... 💐नको निबंधन.............. तुझ्या नि माझ्या घरा असावी भिन्न दालने, एकच अंगण भिन्न असावी नावे गावे माथ्यावर पण एक निळेपण मनामनातुन एकच श्रद्धा जरी दैवते वेगवेगळी जरी निराळ्या आशा भाषा संस्कारांची एक पातळी सुखदुःखा आकार निराळे जीवभाव परि एक असावा कौशल्याच्या तऱ्हा निराळ्या कर्मयोग परि तोच असावा तुझ्या नि माझ्या हृदयामधुनी चैतन्याचे एकच स्पंदन अभंग अपुल्या एकपणाला स्थळकाळाचे नको निबंधन...